Holi special trains for Bihar : होळी हा संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. राज्यातून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी संख्या देखील मोठी असते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने बिहारसाठी विशेष गद्य सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या पुणे आणि मुंबई येथून सोडण्यात येणार आहे.
पाच जोड्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी प्रत्येकी एक जोडी दानापूर आणि मुझफ्फरपूर ते पुणे आणि दानापूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर येथून मुंबईसाठी धावणार आहे.
पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ०१४०९ लोकमान्य टिळक-दानापूर सुपरफास्ट विशेष ट्रेन लोकमान्य टिळक येथून २३, २५ आणि ३० मार्च रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ५ वाजता दानापूरला पोहोचेल. ०१०४३ लोकमान्य टिळक-समस्तीपूर सुपरफास्ट विशेष गाडी लोकमान्य टिळक येथून २१ आणि २८ मार्च रोजी दुपारी १२. १५ वाजता सुटेल आणि समस्तीपूरला दुसऱ्या दिवशी रात्री १०.१५ वाजता पोहोचेल. तर ०५२८१ मुझफ्फरपूर-लोकमान्य टिळक विशेष गाडी २० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान दर बुधवारी मुझफ्फरपूर येथून १ वाजता सुटेल आणि गुरुवारी रात्री १०.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०५२८९ मुझफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी स्पेशल मुझफ्फरपूर येथून २३ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि सोमवारी पुण्याला ५. ३५ वाजता पोहोचेल. ०११०५ पुणे-दानापूर विशेष गाडी पुण्याहून १७ आणि २४ मार्च रोजी ४.१५ वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी १० वाजता पोहोचेल.
कोकणात शिमगोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून या मुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेने अहमदाबाद - मडगाव, एलटीटी - थिविम, पनवेल - सावंतवाडी, उधना - मंगळुरू, सुरत - करमळी होळी विशेष गाड्या या मार्गावर धावणार आहेत.