Malad news : मालाडच्या प्रतिष्ठित लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत आढळले झुरळ; मालकासह मॅनेजर, वेटरवर गुन्हा दाखल-cockroach in cold coffee mumbai malad hope and shine lounge a case has been registered against manager waiter and owner ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malad news : मालाडच्या प्रतिष्ठित लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत आढळले झुरळ; मालकासह मॅनेजर, वेटरवर गुन्हा दाखल

Malad news : मालाडच्या प्रतिष्ठित लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत आढळले झुरळ; मालकासह मॅनेजर, वेटरवर गुन्हा दाखल

Sep 01, 2024 09:05 AM IST

Cockroach in Cold Coffee : मालाड येथील एका मोठा हॉटेलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून मालाड पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालाडच्या प्रतिष्ठित लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत सापडले झुरळ; मालकासह मॅनेजर, वेटरवर गुन्हा दाखल
मालाडच्या प्रतिष्ठित लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत सापडले झुरळ; मालकासह मॅनेजर, वेटरवर गुन्हा दाखल

Cockroach in Cold Coffee : मुंबईत मालाड येथे आइस क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असतांना आता मालाड येथील एका बड्या लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब ग्राहकाणे हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिल्यावरी त्याने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या कडे दुर्लक्ष केल्याने त्याने या बाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.

अंधेरीमध्ये वास्तव्यास असलेला प्रतिक रावत (वय २५) याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मालाड इन्फिनिटी मॉल परिसरातील असलेल्या 'होप अँड शाइन लाउंज' रेस्टॉरन्टमध्ये प्रतीक हा त्याच्या गणेश केकान नामक मित्रांसोबत शुक्रवारी रात्री कोल्ड कॉफी पिण्यासाठी गेला होता. यावेळी दोघांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. वेटरने त्यांना कोल्ड कॉफी आणून दिली. दरम्यान, कॉफीची चव कडवट वाटल्यामुळे त्यांनी ती थोडी गोड करून आणण्यास सांगितले. त्यानंतर प्रतीक व त्याच्या मित्राने कॉफी प्यायला सुरुवात केली. त्यावेळी प्रतिकला ग्लासात काहीतरी दिसले. त्याने ते लक्ष देऊन पाहिले असता ते झुरळ असल्याचं आढळलं. त्यांनी त्याचा फोटो आणि व्हीडिओ काढून ही बाब हॉटेलच्या व्यवस्थापकाला व वेटरला दाखवून दिली. मात्र, त्यांनी ते मान्य केले नाही. यामुळे प्रतीकने थेट मालाड पोलिस ठाणे गाठत या फोटोच्या आधारे हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटर विरोधात तक्रार दिली, त्यानुसार मालाड पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रावत यांच्या म्हणण्यानुसार तक्रार केल्यावर हॉटेल मालक त्यांच्या जवळ आला. त्यांनी तो ग्लास उचलून प्रतीक व त्याच्या मित्राला किचनमध्ये नेले. तिथे त्यांनी कोल्ड कॉफीच्या शेकमध्ये बनवली जाते त्या शेकची जाळी दाखवली व ग्लासमध्ये व कॉफीमध्ये झुरळ जाऊ शकत नसल्याचं सांगितलं. यानंतर ग्लासमधील झुरळ काढून त्यांनी शेकरच्या जाळीवर ठेवत पाण्याचा नळ चालू करून झुरळ यातून जाऊ शकत नसल्याचं दाखवलं. यानंतर त्यांनी कॉफीत आढळलेलं झुरळ बेसिनमध्ये टाकत पाणी सोडून सोडून दिले.

मात्र, प्रतीकने हॉटेल मालकाची ही बाब मान्य केली नाही. प्रतीक म्हणाला, या प्रकरणी मी मालाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या विरोधात पालिकेला देखील पत्र पाठवले आहे. कॉफी बनवताना किंवा ती आणून देताना त्यात झुरळ पडले असू शकते. मात्र, हॉटेल व्यवस्थापनाने या कडे दुर्लक्ष केले गेले. झुरळाचे काही भाग कॉफीतून पोटात गेले असल्याने त्यामुळे माझ्या आरोग्याला हानी होऊ शकते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे प्रतीक याने म्हटलं आहे.

विभाग