CNG Rate Hike in Pune : सध्या इंधनाचे दर वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेल शंभरी पार गेल्याने नागरिकांनी पर्यावरण पूरक सीएनजीला पसंती दिली. मात्र, या सीएनजीचे दर देखील आता वाढू लागले आहेत. पुण्यात सीएनजीच्या एका किलोमागे तब्बल दीड रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता सीएनजीच्या एका किलोसाठी तब्बल ८५ रुपये मोजावे लागणार आहेत. काही दिवसांत बजेट सादर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सीएनजीचे दर वाढल्याने सीएनजी वाहनधारकांना धक्का बसला आहे.
देशातील नागरिक महागाईने होरपळत आहे. पेट्रोल डिझेल ते गॅस सिलेंडरचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यात भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. त्यात आता सीएनजीची भर पडली आहे. स्वस्त आणि पर्यावरण पूरक म्हणून सीएनजी गाडीचा पर्याय परवडणारा असल्याने याला अनेकांनी पसंती दिली आहे. मात्र, महानगर गॅस लिमिटेडने नवे दर लागू केले आहेत. जे मंगळवार पासून लागू झाले आहेत.
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजी आणि घरगुती पाइपलाइन गॅस (PNG) चे नवीन दर जाहीर केले आहे. या दोन्हीच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे याचा परिमाण आता महागाईवर देखील होणार आहे. मंगळवार पासूंन ही दरवाढ लागू झाली आहे. या पूर्वी दिल्लीत सीएनजीच्या किमिती वाढल्या होत्या. त्यानंतर मुंबईत सीएनजीच्या किमीत या दीड रुपयांनी वाढल्या होत्या. तर पीएनजीच्या किमीती देखील एक रुपयांनी वाढल्या होत्या.
सीएनजी आणि पीएनजीचे दर पेट्रोल डिझेल प्रमाणेच महाग होत आहेत. त्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढते असल्याने नागरिक पीएनजी म्हणजेच पाइपलाईनद्वारे गॅस घेण्यास पसंती देत आहे. या मागणीत वाढ होत असतांना आता याचेही दर वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे.