मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेसाठी आता रश्मी ठाकरे मैदानात; बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संवाद
उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे
उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे
26 June 2022, 16:17 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 16:17 IST
  • रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत. त्याचवेळी, उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत.

मुंबई - शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे गडद होत चालले आहे,तसतशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. त्यातच आता तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संकटात सापडली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

एकीकडे शिवसेनेतून बंडखोरांना कारवाईचा इशारा देऊन त्यांच्या भोवतीचा फास आवळला जात असताना दुसरीकडे त्यांचे मन वळवण्यासाठीही प्रयत्नही करण्यात येत आहेत. बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत. त्याचवेळी,उद्धव ठाकरे हे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बंडखोरांचे मन वळवण्यात अपयशी ठरले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,आता या राजकीय लढतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या पत्नींना स्वत: रश्मी ठाकरे यांनी फोन लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधत त्यांना आमदारांसोबत बोलण्यासाठी वळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे,आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांशीही मेसेजद्वारे संवाद साधला आहे. तर काही बंडखोर आमदार शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. तसेच बंडखोर आमदारांकडूनही शिवसेनेसोबत असल्याची वक्तव्ये सातत्याने येत आहेत. त्याचबरोबर आज सकाळी संजय राऊत यांनी शिंदे गटातील १६ आमदार संपर्कात असल्याचे म्हटल्यानेशिंदे गटात संभ्रम निर्माण झाला आहे.