मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ..त्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

..त्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 03, 2022 07:44 PM IST

पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

मुंबई -मशिदीवरील भोंग्यांच्या व हनुमान चालिसाच्या निमित्ताने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरूआहे.मनसे मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या(४ मे)राज्यभर आंदोलन करणार असल्याने सध्या पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

बुधवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतयाबाबतचर्चा केली. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. तसेच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे.

गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये, यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यातआल्याचेरजनीश सेठ यांनीसांगितले.

एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात -

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितले की, १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत, सं रजनीश सेठ यांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या