मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MCA Election: पवार, फडणवीस आणि मला एकत्र पाहून काहींची झोप उडेल : मुख्यमंत्री शिंदे
पवार, फडणवीस आणि मला एकत्र पाहून काहींची झोप उडेल : मुख्यमंत्री शिंदे
पवार, फडणवीस आणि मला एकत्र पाहून काहींची झोप उडेल : मुख्यमंत्री शिंदे (PTI)

MCA Election: पवार, फडणवीस आणि मला एकत्र पाहून काहींची झोप उडेल : मुख्यमंत्री शिंदे

20 October 2022, 8:09 ISTSuraj Sadashiv Yadav

MCA Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र त्यांनी अप्रत्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टोला लगावला आहे.

MCA Election: महाराष्ट्रात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर दिसले. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मुंबई क्रिकेट संघाच्या निवडणुकीआधी स्पेशल डिनरसाठी एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, पवार आमच्या आणि भाजपच्या नेत्यांसोबत एकत्र व्यासपीठावर दिसल्याने काही लोकांची रात्रीची झोप उडू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र त्यांनी अप्रत्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टोला लगावला आहे. शिंदे म्हणाले की, पवार, फडणवीस आणि शेलार एकाच व्यासपीठावर आल्याने काही लोकांची रात्रीची झोप उडू शकते. पण हे राजकारण करण्याची जागा नाहीय. आम्ही सगळे खेळाचे चाहते आणि समर्थक आहे. त्यामुळे आम्ही आपले राजकीय मतभेद बाजुला ठेवून खेळाच्या विकासासाठी एकत्र आलो आहे.

मुंबई क्रिकेट संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाच पदांसाठी निवडणूक होत आहे. एमसीएच्या ९ आणि टी२०, मुंबईच्या सामान्य परिषदेच्या दोन प्रतिनिधींच्या निवडीसाठी २० ऑक्टोबरला मतदान होत आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेसुद्धा निवडणूक लढवत आहेत. पवार आणि बीसीसीआयचे नवनियुक्त खजानिस भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या पॅनेलमधून त्यांनी अर्ज दाखल केला आहे.