मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास..", एकनाथ शिंदेंचा इशारा

"आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास..", एकनाथ शिंदेंचा इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 10, 2022 05:19 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मेळावा असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा तेजस्वी विचार पुढे घेऊन जाणारा हा मेळावा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मेळावा असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा तेजस्वी विचार पुढे घेऊन जाणारा हा मेळावा आहे. 

शिंदे म्हणाले की, गेले १५ दिवस मी धावपळ करतोय. सुरुवातीचे ३ दिवस ३ रात्री मी जोपलोही नव्हतो. सर्व ५० आमदारांची जबाबदारी माझी होती. एकीकडे सत्ताधीश होते, त्यांच्याकडे सरकारी यंत्रणा होत्या. शिवसेनेच्या ४० आमदारांना व अन्य अपक्ष आमदारांना विश्वास देणे सोपं नव्हतो.  ही एक  ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील ३३ देशांनी कौतुक केले आहे. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 
 
या मेळाव्याला शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. आज केवळ आंनद दिघे यांच्या आशीर्वादाने इथे उभा आहे. धर्मवीरमध्ये सगळा प्रसंग दाखवता आला नाही. गेल्या वीस ते २२ वर्ष झाले माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. पण मी डगमगलो नाही. आताही डगमगणार नाही. मी जास्त बोलत नाही. तसेच, टीकाकारांना कामातून उत्तर देईन.

याचबरोबर, मी कमी बोलतो आणि जास्त एकतो. सभागृहात देखील मी कमी बोललो. पण वेळ आल्यावर सर्वकाही सांगेन. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातोय. आज मी मुख्यमंत्री म्हणून उभा आहे तो आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे. तुम्ही धर्मवीर चित्रपट पाहिला असेल. त्यातही सगळं काही सांगता किंवा दाखवता आलं नाही. त्यांनी शिवसेना वाढवली ती बाळसाहेब ठाकरेंना आदर्श मानून त्यांनी दाखवलेला त्याग आजही विसरू शकत नाही. त्यांच्यासमोर २०-२२ वर्षात खूप मोठे प्रसंग आले पण ते पहाडासारखे उभे राहिले. एकनाथ तुला समाजासाठी जगायचं आहे, हा समाज तुझं कुटुंब आहे, असं मला त्यांनी सांगितलं होतं. शाखाप्रमुख ते राज्याचा प्रमुख हा प्रवास सोपा नव्हता. बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय, असंही शिंदे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करुन उत्तर देणार -

शिंदे यांनी टीकाकारांना उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला. काय काय उपमा दिल्या गेल्या. कामाख्या देवीवरुनही टीका झाली. मात्र, देवीनं काय केलं तुम्ही बघितलं, टीका करणाऱ्यांना आम्ही कामातून उत्तर देणार. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करुन उत्तर देणार. आमदाराला सांगितलं की तुमचं नुकसान होतंय. तेव्हा जबाबदारी हा एकनाथ शिंदे घेईल. सभागृहातील भाषण तुम्ही बघितलं असेल. ते थोडच होतं. वेळ आली तर पुन्हा एकदा बोलेन. मी कमी बोलतो, जास्त ऐकतो आणि काम करतो. पुणे विमानतळावर आलो तेव्हा रस्त्याच्या कडेनं लोकाचं प्रेम पाहायला मिळालं. लाखो लोग सहभागी झाले होते, माझं स्वागत करत होते. पोलीस मला सांगत होते. मात्र, मी त्यांना म्हटलंय, ज्यांच्याकडून धोका होतो तो आता टळला आहे. इथल्या माणसांकडून आम्हाला धोका नाही, असंही शिंदे यांनी आवर्जुन सांगितलं.

WhatsApp channel