मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : मोदी लक्षद्वीपला गेले अन् तिकडे मालदीवमध्ये भूकंप आला, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने

VIDEO : मोदी लक्षद्वीपला गेले अन् तिकडे मालदीवमध्ये भूकंप आला, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 12, 2024 04:14 PM IST

Eknath Shinde on Narendra Modi : मोदी लक्षद्वीपमध्ये काय गेले,तिकडे मालदीवमध्ये भूकंप आला. त्यामुळे आपल्या देशाकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. अशी जोरदार टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.

Eknath Shinde on Narendra Modi
Eknath Shinde on Narendra Modi

मोदींच्या हस्ते आज नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर नाशिकमध्ये भव्य रोड शो देखील करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत व मालदीव वादावरून टोला लगावला. मोदी लक्षद्वीपमध्ये काय गेले, तिकडे मालदीवमध्ये भूकंप आला. त्यामुळे आपल्या देशाकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. अशी जोरदार टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.

शिंदे म्हणाले की,आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळेच जगात भारताचं नाव आदरानं घेतलं जात आहे. अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष मोदींकडे सन्मानाने पाहतात. कुणी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढतो, कुणी बॉस म्हणतो, कुणी वाकून नमस्कार करतो. ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

राष्ट्रीय युवक महोत्सवाच आयोजन करण्याची संधी दिली हे आमचे सौभग्य आहे. रामाच्या पवित्र भूमीत मोदी आले ती गौरवाची बाब आहे.बाळासाहेब ठाकरेंसह देशभरातल्या तमाम लोकांचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केलं आहे. मोदींनी गेल्या ९ वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दूरदृष्टी असलेले नेते आहेत. गेल्या ६० वर्षांत झाला नाही, एवढा विकास मोदींनी गेल्या ९ वर्षांत करून दाखवला आहे.

WhatsApp channel