शिवसेना शिंदे गटाने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत १५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मित्रपक्षांना दोन जागा दिल्या आहेत असून या तिसऱ्या यादीत भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नावाचाही समावेश आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत सेनेचे १३ उमेदवार जाहीर करण्यात आले असून दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत तसेच शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोकराव माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी रात्री उशिरा शिवसेनेने तिसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ४५ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत २० जणांची यादी जाहीर केली होती. तर शिंदे गटाने तिसऱ्या यादीत १५ जणांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये २ जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. आतापर्यंत ८० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
शायना एनसी वरळी मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होत्या त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
संबंधित बातम्या