मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज.. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; VIDEO

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज.. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 29, 2022 06:45 PM IST

शिंदे गटाने आता बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे गट शक्तिप्रदर्शनही करणार आहे.अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर (dasara melava teaser) रिलीज करण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतरशिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर (dasara melava teaser) रिलीज करण्यात आला आहे.

शिंदे गटाने आता बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे गट शक्तिप्रदर्शनही करणार आहे. मेळाव्यासाठी शिंदे गटाने खासगी गाड्यांचे बूकिंग केलं आहे. आमदार अन् पदाधिकाऱ्यांकडून एसटी गाड्यांचेही बूकिंग करण्यात येणार आहे. चार हजार पेक्षा जास्त एसटी बसेसचे बूकिंग केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगसाठी बीकेसी परिसरातील दहा मैदानेही पार्किंगसाठी बूक करण्यात आली आहेत.

"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज झाला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या