अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे आयुक्तांना निर्देश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे आयुक्तांना निर्देश

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे आयुक्तांना निर्देश

Published Jun 25, 2024 12:21 AM IST

Pune Drug Case : पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे आयुक्तांना निर्देश
मुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे आयुक्तांना निर्देश

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

तरुण ड्रग्ज घेत असलेला व्हिडिओ रविवारी समोर आल्यानंतर पुण्यात ड्रग्जच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापलं आहे. ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आलंय.

दोन तरुणी ड्रग्स घेतानाचा नवा व्हिडिओ आला समोर -

एका हॉटेलमध्ये काही तरुण वॉशरुममध्ये बसून ड्रग्स घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता दोन तरुणी ड्रग्स घेत असल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसते की, दोन तरुणी मोबाईलच्या स्क्रीनवर अंमली पदार्थांची पावडर टाकून त्याचे सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील एका मॉलमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितले जात आहे.

पुण्यातील एल ३ लिक्विड लिजर लाउंज पबची तोडफोड -

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पबमध्ये शनिवारी मोठी पार्टी रंगली होती. या पार्टीत तरुणांनी तब्बल ८० ते ८५ हजार रुपये दारू आणि खाण्यावर उडवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पुण्यातील संस्कृती खराब होत असल्याने पतित पावन संघटनेच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनी दुपारी १ च्या सुमारास एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब समोर येत घोषणाबाजी केली. तसेच येथील कुंड्यांची तोडफोड केली. व पबवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर