Modi cabinet 2024 : सात खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची एका राज्यमंत्रिपदावर बोळवण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi cabinet 2024 : सात खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची एका राज्यमंत्रिपदावर बोळवण

Modi cabinet 2024 : सात खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची एका राज्यमंत्रिपदावर बोळवण

Updated Jun 10, 2024 10:01 AM IST

Narendra Modi Cabinet 3.0: राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार असून सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद न देता त्यांची केवळ एकच राज्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली आहे. तर एनडीएतील त्यांच्या पेक्षा कमी खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार असून सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद न देता त्यांची केवळ एकच राज्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार असून सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद न देता त्यांची केवळ एकच राज्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली आहे. (HT_PRINT)

Narendra Modi Cabinet 3.0: राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार असून सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद न देता त्यांची केवळ एकच राज्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली आहे. तर एनडीएतील कुमारस्वामी, चिराग पासवान तसेच जीतनराम मांझी यांच्या पक्षाचे पाच पेक्षा कमी खासदार असून सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे सत्ता स्थापनेत भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फारसे महत्व दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sanjay Raut : 'मोदी शपथ घेत होते तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खुनी खेळ सुरू होता,' संजय राऊतांची भाजपवर टीका

राज्यात महाविकास आघाडीने महायुतीचा दारुण पराभव केला. असे असले तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल ७ खासदार निवडून आले आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. भाजपला सत्तेत ठेवण्यासाठी शिंदे यांची भूमिका महत्वाची असतांना देखील त्यांच्या शिवसेनेला केवळ केवळ एकच राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांना एकही कॅबिनेट पद देण्यात आलेले नाही.

IND VS PAK:भारताने पाकिस्तानला लोळवले! मध्यरात्री पुणेकरांचा रस्त्यावर जल्लोष! फटाके फोडून दिल्या घोषणा; व्हिडिओ व्हायरल

तर या उलट तेलुगू देसमचे १६ तर संयुक्त जनता दलाचे १२ खासदार असल्याने मोदी सरकार ३.० मध्ये या पक्षांना मंत्रिमंडळात २ कॅबिनेट मंत्रिपदे दिली आहे. तर ५ खासदार असलेले चिराग पासवान व ३ खासदार असलेले संयुक्त जनता दलाचे कुमारस्वामी, तर केवळ एकच खासदार असलेल्या बिहारमधील हिंदुस्थानी अवामी मोर्चाचे जीनतराम मांझी यांना कॅनिबेट मंत्री पदे देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील त्यांच्या आघाडीतील घटक पक्षाकडे दुर्लक्ष केले असल्याचे सिद्ध झाले आहे.

या पक्षांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देखील एक कॅबिनेटपद मिळणे अपेक्षित होते. मात्र, शिंदे सरकारला केवळ राज्यमंत्री पद देण्यात आले. तर अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजपने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे भाजपने राज्यातील शिंदे व अजित पवार गटाला फारसे महत्त्व दिलेले नाही हे सिद्ध झाले आहे. तर राज्यातील भाजपचे नऊ खासदार असून यातील चार जणांचा भाजपने मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर