मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Parab Resort : अनिल परबांना धक्का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

Anil Parab Resort : अनिल परबांना धक्का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 25, 2022 07:58 PM IST

शिवसेना नेते वराज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab)यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट(Sai Resort)पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

अनिल परबांना धक्का
अनिल परबांना धक्का

Anil Parab Sai Resortdemolition order: शिवसेना नेते वराज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab)यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. याबाबत आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हा दावा केला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आली आहे. ते रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज दुपारपर्यंत आदेश देतील. हे रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार की जिल्हाधिकारी यासाठी टेंडर मागवणार हे स्पष्ट नाही. याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिसॉर्ट पाडण्यात येईल, असे सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले की, रिसॉर्ट तर जमीनदोस्त केले जाणार आहेच, मात्र त्यासोबतच या अनधिकृत रिसॉर्टसाठी पैसे कुठून आले याचाही तपास केला जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

अनिल परब यांचे दापोली-मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले साई रिसॉर्ट हे नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खूप पूर्वी केला होता. यावरून त्यांनी अनेकदा धरणे आंदोलनही केले होते. या संदर्भातील सर्व कागदपत्रेही सोमय्यांनी सरकारला सादर केली होती. त्यानंतर आता रिसॉर्ट तोडण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

IPL_Entry_Point