मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Eknath Shinde : आरएसएसवरील बंदीच्या मागणीने भडकले मुख्यमंत्री; म्हणाले थोडी तरी वाटू द्या..

CM Eknath Shinde : आरएसएसवरील बंदीच्या मागणीने भडकले मुख्यमंत्री; म्हणाले थोडी तरी वाटू द्या..

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 05, 2022 10:44 PM IST

CM Eknath Shinde Dasara melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्याअनेक आरोपांवर उत्तर दिले. पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस ने पीएफआयवर देखील बंदीची मागणी केली. या मागणीचा एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई : देशविघातक कारवाया करणाऱ्या पीएफआय संघटनेवर नरेंद्र मोदी यांनी बंदी घातली तेव्हा एकाही शब्दाने तुम्हाला बोलता आलं नाही. उलट या संघटनेवर बंदी घातल्यावर आरएसएसवर देखील बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाही, ज्या ज्या वेळी देशात संकटे आली त्या त्या वेळी आरएसएसही संघटना मदतीसाठी पुढे राहिली. राष्ट्रबांधणीत या संघटनेचा मोठा वाटा आहे. या संघटनेची तुलना तुम्ही पीएफआयशी करता? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रावाडी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसवर हल्ला केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, जेव्हा जेव्हा आपत्ती संकट येतात त्या त्या वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे असतो. राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यात या संघटनेचा हात कुणी धरू शकत नाही.या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी अतिशय हास्यस्पद आहे. आज हिंदुस्थानात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. त्यावर तुम्ही एक चकार शब्द काढू शकले नाही. पण मी आज इथे व्यासपीठावरून सांगतोय, अशा घोषणा दिल्या जाणाऱ्या पिलावळीला ठेचून काढलं जाईल, असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिला.

शिंदे म्हणाले, इथे अब्दुल सत्तार बसले आहेत. देशभक्त आणि हिंदुत्ववादी पक्ष आपला बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेत असताना इतर समाजाचा एक इतर धर्माचाही आदर करणारे आम्ही लोक आहोत. आमच्या पाठीशी बाळासाहेबांची शिकवण आहे. या देशाच्या एकात्मतेला अखंडतेला नख लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर यापुढे बिलकुल तो खपवून घेतला जाणार नाही. पीएफआय संघटनेवर बंदी घातली तेव्हा एकाही शब्दाने तुम्हाला बोलता आलं नाही. . मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं होतं केंद्राने मोदी साहेबांनी आणि अमित शहा यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. या राज्यामध्ये देखील तो पाळला जाईल . या राज्यात आणि देशात या देशाच्या विरोधामध्ये कारवाया करणारा सोडलं जाणार नाही, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग