मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मिशन BMC, मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केल्या शिंदे गटाच्या नियुक्त्या

मिशन BMC, मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केल्या शिंदे गटाच्या नियुक्त्या

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 30, 2022 08:08 AM IST

BMC Election 2022: मुंबईतील पाच विभाग प्रमुख आणि तीन विभाग संघटकांची नियुक्ती करण्यात आलीय. यासंदर्भात नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना काल दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईतील पाच विभाग प्रमुख आणि तीन विभाग संघटकांची नियुक्ती करण्यात आलीय. यासंदर्भात नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना काल दिले. तसंच पक्षविस्ताराचं काम सुरु करण्यासाठी सूचनाही दिल्या.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या सचिवांसह आमदारांची एक विशेष बैठक सोमवारी झाली. यावेळी खासदार आणि शिंदे गटाचे सचिव राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, आमदार यामिनी जाधव, सचिव संजय मोरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. या बैठकीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नियुक्या जाहीर करत जबाबदारी सोपवली.

दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक 10 च्या विभागप्रमुखपदी गिरीश धानुरकर यांची आणि विभागसंघटकपदी प्रिया गुरव यांची नियुक्ती केली आहे. भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मध्ये माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी वर्णी लागली. तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आलीय. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक 9 मध्ये विभागप्रमुख पदाची जबाबदारी माजी नगरसेवक मंगेश कुडाळकर यांच्यावर सोपवली आहे. तर कला शिंदे यांच्याकडे विभाग संघटकपद देण्यात आलं आहे. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक 12 च्या विभागप्रमुख पदी दिलीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विभाग क्रमांक 9 मध्ये अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती केलीय.

WhatsApp channel

संबंधित बातम्या