मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तिरुपतीमध्ये झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

तिरुपतीमध्ये झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 26, 2023 09:19 PM IST

Eknath Shinde : अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde (HT_PRINT)

Road Accident In Tirupati : बालाजी दर्शनासाठी तिरुपतीला गेलेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी होते. त्यानंतर आता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बालाजी दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

तिरूपती येथे दर्शनासाठी सोलापूर येथून गेलेल्या तरुणांच्या वाहनाला तिरूपतीजवळील नायडूपेट-पूथलापट्टू मार्गावर अपघात झाला होता. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर तिरूपती देवस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचाराबाबत सोलापूर प्रशासनाला निर्देश दिले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील नऊ भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी स्पेशल वाहन करून रवाना झाले होते. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर कनिपमकडे जाताना भाविकांची कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीनं तिरुपतीमधील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point