मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  केंद्र महाराष्ट्राबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे विधान

केंद्र महाराष्ट्राबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 08:48 PM IST

Cm Eknath shinde on sugar industry: दिल्लीत गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत मोठा निर्णय घेणार आहे. याचा फायदा कारखाने तसेच शेतकऱ्यांना होईल.

मुख्यमंत्र्यांकडून अमित शहांची भेट
मुख्यमंत्र्यांकडून अमित शहांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नार्थ ब्लॉक येथील गृह मंत्रालयात ही भेट झाली. या बैठकीत महाराष्ट्राशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अमितशहा यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी व सशक्त बनवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. याचा निश्चितच महाराष्ट्रातील साखरउद्योग व शेतकऱ्यांना फायदा होईल.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्रीय सहकारमंत्री महाराष्ट्रातील साखर उद्योग व शेतकऱ्यांना हिताचे निर्णय घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा व्यवस्था चोख आहे. पोलीस व तपास यंत्रणा अलर्टवर आहेत.

दुसरीकडे आपल्या वादग्रस्त वक्तव्याने मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. राजभवनाकडूनही याची माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका टीव्ही चॅनेलला प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, त्यांची इच्छा असेल तर पुढची पाच वर्षे महाराष्ट्राचे राज्यपाल राहू शकतात. त्यांच्याकडे कोणीही राजीनामा मागितलेला नाही.

IPL_Entry_Point