मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजभवनातून धक्कादायक खुलासा; मुख्यमंत्र्यांची शपथ असंवैधानिक?

राजभवनातून धक्कादायक खुलासा; मुख्यमंत्र्यांची शपथ असंवैधानिक?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 07:08 PM IST

Government oath is Unconstitutional : शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचे माहिती अधिकारात समोर आल्याने खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्र्यांची शपथ असंवेधानिक?
मुख्यमंत्र्यांची शपथ असंवेधानिक?

मुंबई – शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यानंतर शिंदे गट व भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र आता नव्या सरकारचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच राजभवनकडून नुकत्याच दिलेल्या माहिती अधिकारात समोर आली असून राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली ही शपथच असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

एकीकडे सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक खुलासा माहिती अधिकारात राजभवनकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकवेळा विविध वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह मुंबईकर जनतेचाही अपमान केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने विधानपरिषदेसाठी दिलेल्या १२ उमेदवारांच्या नावांना दोन वर्षानंतरही मंजुरी दिली नाही, या गोष्टींकडेही महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

माहिती अधिकारात झालेल्या या नव्या खुलाशामुळे आता नवे प्रश्न निर्माण झाले असून आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनात्मक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे. दरम्यान राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याने या प्रकरणाचा पेच आणखी वाढला आहे.

IPL_Entry_Point