मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath shinde : भगवी वस्त्रे, रुद्राक्ष घालून कोणी.., मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Eknath shinde : भगवी वस्त्रे, रुद्राक्ष घालून कोणी.., मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2024 11:54 PM IST

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray : भगवी वस्त्रे व रुद्राक्ष घालून कोणाला बाळासाहेब ठाकरे होता येत नाही, त्यासाठी तसे धगधगते विचार असावे लागतात, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray

नाशिकमध्ये पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर कडाडून हल्ला केला. महाराष्ट्रचे वैभव ओरबाडले जात असताना मिंधे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला होता. तसेच उद्धव ठाकरेंनी काल भगवी वस्त्रे व गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून काळाराम मंदिरात आरती केली होती. यावर शिंदेंनी खोचक टोला लगावला आहे.

'लबाड लांडगं ढाँग करतंय, वाघाचं कातडं ओढून साँग करतंय. वाघ एकला राजा. बाकी खेळ माकडांचा…'या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

भगवी वस्त्रे आणि रुद्राक्षांच्या माळा घालण्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवे वस्त्र आणी रुद्राक्ष माळा घालून कोणालाही बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे धगधगते विचार असावे लागतात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणण्यासाठी वाघाचं काळीज लागतं.

काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर होऊन,सत्तेसाठी सर्वात मोठा कोणी मिंदे पणा केला,असा प्रश्नही त्यांनीउपस्थित केला.

 

लबाड लांडगा वाघाचं काताडं पांघरून वाघ होण्याचं सोंग करतो. पण वाघ होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. आमचा वाघ एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असे शिंदे म्हणाले.

WhatsApp channel