Sanjay Raut on Varsha Bunglow in Mumbai: राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. या गोष्टीला आता दोन ते तीन महीने झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईच्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्याबाबत ते अद्याप राहायला गेलेले नाहीत. यावरून खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी दावा गेला आहे. त्यांनी नवा मुख्यमंत्री जास्त दिवस टिकू नये या साठी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरून बंगल्यावर जादूटोणा केल्याचं म्हटलं आहे. नाशिक येथे एका कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला आहे.
खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, ते त्यांचे अधिकृत निवस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अद्याप राहायला गेलेले नाहीत. ते वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाही ? हा आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान हा राज्याच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय असतांना आमचे लाडके मुख्यमंत्री मात्र, अद्याप तिकडे राहायला गेले नाहीत. मी असं ऐकलंय की, देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की, मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही. राज्यातील लिंबू सम्राटांनी या बाबत उत्तर म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात ही कुजबुज रंगली असल्याचे राऊत म्हणाले. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, तो दीर्घकाळ टिकू नये यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जाण्यास तयार नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याला महात्मा फुले यांच्यापासून ते संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांची परंपरा मोठी परंपरा आहे. त्यांनी राज्यातून या सगळ्यांनी राज्यातून अंगारे-धुपारे आणि अंधश्रद्धा हद्दपार केली. मात्र, सध्या जे राज्यात चाललं आहे, ते चुकीचं आहे, असेही राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या