वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? जाणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? जाणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."

वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? जाणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."

Updated Feb 04, 2025 10:49 PM IST

Devendra Fadanvis On Varsha Bunglow : देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य अजूनही सागर बंगल्यावरच असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis On Varsha Bunglow residence : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत, मात्र अद्याप ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) रहायला गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य अजूनही सागर बंगल्यावरच असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी केलेल्या आरोपांमुळेही ‘वर्षा’ बंगला पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’वर कधी रहायला जाणार याची माहिती दिली.

एका वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षावर राहायला कधी जाणार हा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला त्याठिकाणी राहायला जायचे होते. मात्र तेथे काही छोटी मोठी कामे सुरू होती. तसेच माझी मुलगी दहावीच्या वर्गात शिकते. तिची दहावीची परीक्षा येत्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यावरच आपण शिफ्ट होऊ,असे तिने मला सांगितले आहे. त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर तूर्त राहायला गेलो नाही. मात्र मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षावर राहायला जाणार आहे. मात्र, वर्षावर मी कधी राहायला जाणार यावर वेड्यासारख्या चर्चा सुरु आहेत.

गेल्या दोन दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा या बंगल्यावर राहायला का येत नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्याचबरोबर गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस म्हणून रेडे कापले आणि त्याचे शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात पुरल्याचे बंगल्यावरील कर्मचारी सांगतात. यामुळे वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे राऊत यांनी म्हटले होते.

 

तसेच मुख्यमंत्रीपद इतर कोणत्याही नेत्याला मिळू नये यासाठी ही कृती केल्याची शंकाही संजय राऊत यांनी उपस्थित केली. या चर्चेला आतामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीपूर्णविराम दिला आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर