मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

May 19, 2024 09:25 PM IST

Cloudburst Rain : अडरे गावात केवळ अर्ध्या तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. या पावसाने अडरे,अनारी परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या.एका तासात तब्बल ११० मी.मी पाऊस झाला.

चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी!
चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी!

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट होत आहे. काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु, चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य (Cloudburst) पावसाचे आता व्हिडिओ समोर येत आहेत.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

अडरे गावात केवळ अर्ध्या तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. (Cloudburst like rain in adare village of Chiplun) या पावसाने अडरे,अनारी परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या.एका तासात तब्बल ११० मी.मी पाऊस झाला. अचानकपणे जोरदार पाऊस बरसल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

१ तासात धडकी भरवणारा पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे (Cloudburst Rains) ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. मे महिन्यातच आलेल्या या अवकाळी पावसाने येथील नद्यांना पूर आल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे अडरे गावात पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र मुसळधार पावसाने बांधकामाचे साहित्यही वाहून गेले आहे. जुलैमध्ये जसा मुसळधार पाऊस पडतो तसा पाऊस नागरिकांनी मे महिन्यातच अनुभवायला मिळाला. या पावसाने शेतांमध्ये पाणी जमा झाले तसेच ऐन उन्हाळ्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या.

चिपळूणमधील अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कसा झाला, याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे.

परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे. एका तासात ११० मी.मी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. तर महाराष्ट्रात ११ जूनला पोहोचेल. तसंच यावर्षी पाऊस जवळपास १०६ टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मान्सून साधारणपणे १ जूनला केरळ किनारपट्टीवर दाखल होत असतो, मात्र यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनचे आमगन तीन-चार दिवस पुढे मागे होऊ शकते, त्यामुळे ३० मे ते ४ जून दरम्यान मान्सून भारतात येण्याची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४