मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता

मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता

Updated Sep 23, 2024 07:10 AM IST

Mumbai development projects : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि प्रवसाचा वेळ कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्यांना मान्यता मिळाली आहे.

मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता
मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता

Mumbai development projects : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील जीवन अतिशय वेगवान आहे. रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार राजधानी मुंबईत होत आहे. मात्र, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. त्यांची ही गैरसोय कमी करण्यासाठी आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल १ तासांनी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) रिंगरोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे. ज्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि आणि पुढील पाच वर्षांत प्रवासाचा वेळ देखील कमी होईल.

या योजने अंतर्गत एमएमआरडीएने मंजूर केलेल्या ५८,००० कोटी रुपयांच्या योजनेतून ९० किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते, पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत. हे सर्व सस्ते शहराला बाहेरील बाजूंनी जोडतात आणि उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. शहराच्या उत्तरेकडील गुजरात सीमेवर, दक्षिणेकडील कोकण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हे वर्तुळाकाळ रस्ते जातात. येतून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत येत असतात.

पायाभूत सुविधांवर भर

शहरात रोज होणारी वाहतूक कोंडी आणि वाढत्या गर्दीचे निऑयजन करण्यासाठी आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. रस्ते, पूल आणि बोगद्यांच्या नवीन जाळ्यांद्वारे, जलद आणि अधिक कार्यक्षम प्रवास मार्ग बांधून शहरातील होणारी अवजड वाहतुकीचा मार्ग बदलण्याच्या उद्देशाने एमएआरडीएने हा मेगा प्लॅन आखला आहे.

असा असेल रिंग रोड

या योजने अंतर्गत ७ बाह्य आणि अंतर्गत रिंग तयार केले जाणार आहेत. सध्या हे प्रकल्प निविदा व विकासाच्या विविध टप्प्यांवरआहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यासारख्या विविध विकास प्राधिकरणे रिंग रोड नेटवर्कची स्थापना करण्यासाठी MMRDA ला सहकार्य करणार आहेत. सध्याच्या पायाभूत सुविधांवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने यापैकी बहुतांश नवीन रस्त्यांवर टोल आकारणी केली जाणार आहे. ते "मुंबई इन मिनिट्स" च्या दीर्घकालीन दृष्टीच्या अनुषंगाने, अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी ही प्रकल्प राबवले जाणार आहेत. ज्याचा उद्देश संपूर्ण शहरात प्रवासाचा वेळ हा एका तासापेक्षा कमी करणे हा आहे.

या बाबत एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एका वृत्तपत्राला माहिती देतांना सांगितले की, "जेव्हा आपण मुंबईला मिनिटांत म्हणतो, तेव्हा शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी ५९ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये. ९० किमी पेक्षा जास्त नवीन रस्ते विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय निधीसह, मुंबईच्या वाहतूक नेटवर्कमधील, विशेषतः पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीमधील तफावत दूर करण्यासाठी येत्या काळात मोठे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. एकट्या MMRDA कडून एकूण ३ लाख कोटींचे प्रकल्प, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी सारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या मदतीने हाती घेण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांच्या जाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मुंबईचा आणखी भरीव शहरी विकास होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर