मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena: डोंबिवलीत शिवसैनिक-शिंदे समर्थक आमने-सामने, महिला कार्यकर्त्यांना अटक; शहरात तणाव

Shiv Sena: डोंबिवलीत शिवसैनिक-शिंदे समर्थक आमने-सामने, महिला कार्यकर्त्यांना अटक; शहरात तणाव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 01:27 PM IST

Shiv Sena Office Dombivli : डोंबिवलीतील पक्षाच्या मुख्य कार्यालयावरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटला आहे.

Shinde Group vs Shiv Sena In Dombivl
Shinde Group vs Shiv Sena In Dombivl (HT)

Shinde Group vs Shiv Sena In Dombivli : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता डोंबिवलीतील पक्षाच्या कार्यालयावरून शिंदे गटाचे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयावर शिंदे गटानं ताबा घेतला होता. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेमकांविरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर शहरात मोटा तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील शिवसेनेचं मुख्य कार्यालयाची नोंदणी शिंदे गटानं केली आहे. याची माहिती शिवसैनिकांना समजताच त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेत उद्धव ठाकरेंविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळं शहरातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून डोंबिवली पोलिसांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

महिला शिवसैनिकांना अटक...

शिवसेनेत फूट पडल्यानंतर डोंबिवली शहरातील पक्ष कार्यालयावर शिंदे गट आणि शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळं महिला शिवसैनिकही चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता पोलिसांनी काही महिला शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp channel