Cidco Lottery 2025 : मुंबईत आपलं स्वताचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. नगरिकांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोने नवी मुंबईत ६७ हजार घरांच्या विक्रीचे नियोजन केले आहे. यातील २६ हजार घरांच्या विक्री करण्यासाठी 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजना आणली होती. या योजनेला चार वेळा मुदत वाढ देऊनही नागरिकांचा फारसा प्रतिसाद या योजनेला मिळाला नाही. या योजनेसाठी १ लाख ६० हजार नागरिकांनी अर्ज दाखल केले. मात्र, यातील फक्त १५ हजार नागरिकांनी घर खरेदीसाठी बूकिंगचे पैसे भरले आहे. १५ फेब्रुवारीला सोडत जाहीर केली जाणार आहे.
सिडकोच्या नवी मुंबईतील खारघर, वाशी ट्रक टर्मिनल,खांदेश्वर, तळोजा, पनवेल, कळंबोली बस डेपो, मानसरोवर रेल्वे स्टेशन, उलवे खारकोपर या भागातील घरांसाठी अर्ज करण्याची मुदत ही चार वेळा वाढवण्यात आली आहे. आज ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे. तर १५ घरांसाठी प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क जमा करण्यासाठी ३१ जानेवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपल्यावर 3 फेब्रुवारीला अर्जदारांची मसुदा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तर अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या वेबसाईटवर १० फेब्रुवारीला जाहीर केली जाईल. यानंतर सोडत १५ फेब्रुवारीला काढली जाणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळवा यासाठी सिडकोनं चार वेळा मुदतवाढ दिली आहे. आता पर्यंत १ लाख ६० हजार नागरिकांनी घर खरेदीसाठी अर्ज केला आहे. मात्र, प्रत्यक्ष बूकिंग अमाऊंट मात्र, फक्त १५ हजार जणांनी भरले आहे.
सिडकोने घर खरेदीची ही योजना जाहीर केल्यावर २३६ रुपये भरून नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र, घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. यानंतर घरांच्या किमती या जाहीर करण्यात आल्या होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी २५ ते ४८ लाख रुपयांच्या किमत जाहीर करण्यात आली होती. तर अल्प उत्पन्न गटातील सर्वाधिक घराची किंमत ९७ लाख रुपयांपर्यंत होती. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या किमती कमी करण्यात आल्या नाही. त्यामुळे सर्वाधिक अर्ज येऊन देखील काही मोजक्या नागरिकांनी बूकिंग शुल्क भरले आहे.
संबंधित बातम्या