CIDCO House Lottery : मुंबईत म्हाडाने घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या साठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अर्ज केले आहेत. या लॉटरीत जर तुम्ही अर्ज करू शकला नसाल तर नाराज होऊ नाका. आता सिडकोने देखील मोठ्या लॉटरीची घोषणा केली आहे. या लॉटरीअंतर्गत तब्बल ४० हजार घरे विकली जाणार असून येत्या दसऱ्याला या लॉटरीला मुहूर्त मिळणार आहे.
सध्या मुंबईत म्हाडाच्या लॉटरीची चर्चा सुरू आहे. म्हाडाने २०३० घरांची सोडत प्रक्रिया राबवली आहे. लवकरच ही घरे कुणाला मिळणार याची लॉटरी लागणार आहे. तसेच घरे कुणाला मिळणार नाही ही देखील कळणार आहे. त्यामुळे या लॉटरीत जार घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर अशा नागरिकांना सिडको पुन्हा एक संधी देण्यार आहे. येणाऱ्या दसऱ्यात सिडको तब्बल ४० हजार घरांच्या लॉटरीची सोडत जाहीर करणार आहे. ही घरे रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये असणार आहे. त्यामुळे मुंबई व मुंबई उपनगरांत राहणाऱ्यांना आता परवडणारी घरे लकरच उपलब्ध होणार आहे. रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची ही पहिलीच लॉटरी राहणार आहे.
सिडकोद्वारे काढण्यात येणारी ही घरे वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी आहेत. सध्या सिडको मुंबईत ६७ हाजार घरांचे बांधकाम करत आहेत. यातील ४० हजार घरे ही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही लॉटरी काढली जाणार आहे. ही घरे नागरिकांना परवडणाऱ्या किमितीत उपलब्ध होणार आहे.
म्हाडाच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. ऑगस्ट महिन्यात या लॉटरीची घोषणा करण्यात आली होती. तर आज १९ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. पुढच्या महिन्यात ही सोडत जाहीर केली जाणार आहे. तब्बल २०२० घरांची सोडत ही लवकच निघणार आहे.