Chiplun Crime: चिपळून तालुक्यातील सावर्डेजवळील नांदगाव गोसावीवाडी येथे वृद्ध महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेच्या अवघ्या २४ तासात पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मृत महिलेने आरोपीला तू बेवडा आहेस, असे म्हटले होते, याचा राग डोक्यात ठेवून त्याने आईच्या वयाच्या महिलेची निर्घृण हत्या केली.
सुनिता परशुराम पवार (वय, ६०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, स्वप्नील खातू असे आरोपीचे नाव असून तो बीएसटीमध्ये नोकरीला आहे. स्वप्नील हा मूळचा चिपळूनचा असून सध्या मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास आहे. सुनिता पवार यांच्या घराशेजारी स्वप्नीलच्या बंगल्याचे काम सुरू आहे. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी सुनिता यांचे पती दहीहांडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेजाऱ्यांसह नांदगाव खुर्द येथे गेले होते. घरी परतल्यानंतर पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून परशुराम यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्वरीत या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना मृतदेहाजवळ सिलिंडर, ब्लुटूथ आणि रक्ताचे कपडे आढळून आले. या घटनेचा तपास करताना पोलिसांना शेजारी राहणाऱ्या स्वप्नीलवर संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता सुरुवातील त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. मात्र, यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली. हत्येमागचे कारण विचारले असता आरोपी म्हणाला की, सुनिता यांना त्याला तू बेवडा आहेस, असे म्हटले होते. याचा राग डोक्यात ठेवून त्याने सुनिता यांची हत्या केली.
२२ वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याने त्याने पाच वर्षांपूर्वी बेपत्ता असलेल्या पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना कर्नाटकाच्या मगदी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर जिल्ह्यातील मगदी तालुक्यातील हुजुगल गावचा रहिवासी किरण कुमार याला मित्राच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने पाच वर्षांपूर्वी पत्नीचीही हत्या करून मृतदेह मगदीच्या हुजल जंगलात दफन केला होता. त्यावेळी आरोपीने सासरच्या मंडळींना आपली मुलगी एका पुरुषासोबत पळून गेल्याचे त्याने सांगितले होते. आरोपीवर दोन महिलांच्या हत्येप्रकरणी बीएनएस १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.