धक्कादायक.. १३ वर्षीय चिमुकलीचा विवाह ४० वर्षीय व्यक्तीसोबत, परभणीतील प्रकार
Child marriage : परभणीत १३ वर्षीय चिमुकलीचा विवाह ४० वर्षाच्या व्यक्तीबरोबर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे आहे. या प्रकरणी पाथरीतील १३ जणांवर गुन्हा दाखल झाला
Child Marriage : महाराष्ट्रात सर्वाधिक बालविवाह परभणी जिल्ह्यात पार पडतात. दोन दिवसांपूर्वीच गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी पोलिसांनी चार बालविवाह रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १३ वर्षीय चिमुकलीचा विवाह ४० वर्षाच्या व्यक्तीबरोबर लावला आहे. या प्रकरणी पाथरीतील १३ जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ५ आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातील पाथरीमधील आदर्श नगरमध्ये २ डिसेंबर २०२२ रोजी एक बालविवाह झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. यावरून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कारवाई केली. माहिती गोळा केल्यानंतर समजले की, पाथरीतील आदर्श नगरमध्ये केवळ १३ वर्षाच्या मुलीचा विवाह चाळिशी पार केलेल्या व्यक्तीबरोबर लावण्यात आला होता. यामध्ये मुलीला पैशांच्या बदल्यात या व्यक्तीकडे सोपवल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. इतकेच नव्हे तर मुलगी अल्पवयीन असूनही ती सज्ञान असल्याचे बनावट दस्तावेज तयार करण्यात आले होते. हे सर्व कागदपत्रे जप्त केली असून मुलीचा पती, सासू, मुलीचे आई- वडील यांच्यासह इतर ९ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण खूपच वाढले आहे. एका आठवड्यात जिल्ह्यात ९ बालविवाह रोखले गेले आहेत. परभणी जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.