Boy Died in cat attack in Nagpur: नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगणात खेळत असतांना एका चिमूकल्याला मांजराने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा तालुक्यातील उखळी गावात शनिवारी घडली. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (वय ११) असे माजरांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शनिवारी तो अंगणात खेळत असतांना सांयकाळी मांजरानं हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उखळी येथे घरी असतांना श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम हा घरात अंगणात खेळत होता. दरम्यान, श्रेयांशू खेळत असताना अचानक मांजराने त्याच्यावर हल्ला केला. मांजराच्या हल्ल्यात श्रेयांशू हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने घरातील व्यक्तिंनी दवाखान्यात भरती केली. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घरात लहानमुले असतांना त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. घरातील सदस्यांचे लक्ष नसल्यामुळे अनेक मोठ्या दुर्घटना या पूर्वी झाल्या आहे. नागपुरात असाच मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या