मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Video: शिवसैनिकांची घोषणाबाजी अन् फुलांच्या वर्षावात मुख्यमंत्री ‘वर्षा’बाहेर..
मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला
मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला
22 June 2022, 22:46 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
22 June 2022, 22:46 IST
  • उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीवर गेले. वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती.

मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीफेसबुक लाइव्ह करत जनतेशी संवाद साधला. त्यांनी म्हटले होते की, मी आजच वर्षा बंगला सोडून मातोश्रीला जाणार आहे. मला पदाचा मोह नाही,मी आजही मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार आहे. बंडखोर आमदारांनी समोर यावं,अशी भावनिक साद घातली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. आज प्रत्येक शिवसैनिक भावुक झाला होता. बुधवारी ९वाजून ४५मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले.

वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या गाडीला शिवसैनिकांनी गराडा घातला. यावेळी रश्मी ठाकरेही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.