मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Session : मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी

Assembly Session : मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये, धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 22, 2022 04:41 PM IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असतानाएकनाथ शिंदे (Eknath shinde)यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतोय हेदुर्दैव आहे.राज्याचे नाथ म्हणवणाऱ्याएकनाथ शिंदे यांनी'एकनाथ'च रहावे, 'ऐकनाथ' होऊ नये, असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी लगावला.

धनंजय मुंडेंची विधानसभेत तुफान टोलेबाजी
धनंजय मुंडेंची विधानसभेत तुफान टोलेबाजी

Maharashtra Assembly Monsoon Session: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Assembly Monsoon Session) आज (सोमवार) विरोधकांना सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच ५० खोके माजलेत बोके अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सभागृहातील वातावरणही सत्ताधारी-विरोधकांच्या तुफान टोलेबाजीने तापलेलं राहिले. पावसाळी अधिवेशनला अजून चार दिवस शिल्लक राहिले असून विविध मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

आज अधिवेशनातील (Assembly Monsoon Sessionचर्चेदरम्यान बीडचे आमदार धनंजय मुंडे ( Dhananjay munde) यांनी चांगलीच टोलेबाजी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतोय हे  दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 'एकनाथ'च रहावे, 'ऐकनाथ' होऊ नये, असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून केली जावी, या विधेयकावर चर्चा होत असताना विरोधकांकडून याचा विरोध करण्यात आला. नगराध्यक्षांबरोबर मुख्यमंत्र्यांची निवडही जनतेतून करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, हा मागणी जनतेतूनच आली आहे. यावर टिप्पणी करताना धनंजय मुंडे (Dhananjay munde ) म्हणाले की, महाआघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा निर्णय मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता. मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांना एकनाथच रहावे, अशी कोपरखळीही लगावली.

यावेळची विधानसभा अत्यंत वेगळी असून सर्व पक्षांना मत दिलेल्या जनतेला आपापले पक्ष सत्तेत आल्याचा आनंद मिळत आहे, अशीच परिस्थिती समजा नगर परिषद निवडणुकीत झाली तर पक्ष कोणता अन नगराध्यक्ष कोणाचा, अशी विचित्र स्थिती निर्माण होऊ शकते, तसेच हा निर्णय घ्यायचाच असेल तर मग मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून होऊन जाऊ द्या, असे आव्हानही मुंडे यांनी दिले आहे. 

धनंजय मुंडे म्हणाले की, लोकप्रतिनिधी सोबत असणाऱ्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले आहे.

WhatsApp channel