एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार! श्रीराम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण आले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार! श्रीराम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण आले

एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार! श्रीराम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण आले

Jan 09, 2024 03:20 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून या सोहळ्यासाठी ते अयोध्येला जाणार आहे.

Maharashtra Chief Minister and Shiv Sena chief Eknath Shinde receives invitation to attend the opening ceremony of the Ram Temple in Ayodhya
Maharashtra Chief Minister and Shiv Sena chief Eknath Shinde receives invitation to attend the opening ceremony of the Ram Temple in Ayodhya (Eknath Shinde-X)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून या सोहळ्यासाठी ते अयोध्येला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रित दिले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी 

दरम्यान, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठाच्या अनुषंगाने विविध उपक्रम आयोजित करून हा क्षण सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले आहे. घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका, आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाही

दरम्यान, अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणाची गरज नसल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम हा भाजपचा कार्यक्रम असून हा कार्यक्रम झाल्यानंतर अयोध्ये मंदिरात दर्शनासाठी आम्ही जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनाही अयोध्येच्या कार्यक्रमाचे आमंत्रण आले नाही.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर