मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; मेळाव्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट

Eknath Shinde: 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; मेळाव्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 05, 2022 06:02 PM IST

दरम्यानदसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांनीट्विट (Chief minister Eknath shinde tweet) केलं आहे. यामध्ये "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे ", या भारतीय कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी लिहिल्या आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई - एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर तर झालेच मात्र याचा परिणाम शिवसेनेच्या दसरा मेळावा व शिवसेनेतील पक्ष संघटनेवरही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे एकाच दिवशी दोन दसरा मेळावे अन् तेही मुंबईत होत आहेत. तसेच खरी शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह धनुष्यबाणावर कोणाचा हक्क याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असला तरी कोणाची शक्ती किती याचा प्रत्यय आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने येणार आहे. मुंबईतील शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानात बुधवारी सकाळपासून राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली आहे.

मेळाव्याला गर्दी खेचण्याचे प्रयत्नठाकरे गट आणि शिंदे गटानेकेले आहेत. त्यामुळे कोणाचा मेळावा तुफान गर्दीचा होणार याची उत्सूकचा जनतेला आहे.ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येण्यास आधीच सुरुवात झाली आहे.

दरम्यानदसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांनीट्विट (Chief minister Eknath shinde tweet) केलं आहे. यामध्ये "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे ", या भारतीय कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी लिहिल्या आहेत. तसेच विचारांचे वारसदार असंही म्हटलं आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या