Eknath Shinde : जर्मनीच्या मदतीने राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार–एकनाथ शिंदे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : जर्मनीच्या मदतीने राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार–एकनाथ शिंदे

Eknath Shinde : जर्मनीच्या मदतीने राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार–एकनाथ शिंदे

Feb 28, 2024 08:57 PM IST

Eknath Sinde on Employment : मराराष्ट्रातील ४ लाख तरुणांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो रोजगार मेळाव्यात केली.

Eknath Sinde on Employment
Eknath Sinde on Employment

बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. 

राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. 

अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ यांनी भाष्य केले. 

त्यावेळी एकनाथ श‍िंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.

Whats_app_banner