मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “ज्यांना दाखवायचा होता त्यांना आम्ही ३० जूनलाच हात दाखवला”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर

“ज्यांना दाखवायचा होता त्यांना आम्ही ३० जूनलाच हात दाखवला”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 24, 2022 10:22 PM IST

Eknath Shinde on Astrology : शिर्डी दौऱ्यात ज्योतिषाला हात दाखवण्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना हात दाखवायचा त्यांना ३० जून रोजीच दाखवला व चांगला दाखवल्याचं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. याच दौऱ्यात ते एका ज्योतिषाकडं जाऊन भविष्य पाहून आले. त्यावरून आताविरोधकांनी टीकेची झोड उठवली असून शरद पवारांनीही अशी कृती महाराष्ट्रात नवीनच असल्याचा टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. 

यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर शिंदे यांनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आसाममधील कामाख्या देवीला जाणार आहे हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन सरकार स्थापन केलंआहे. कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही. आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. लपूनछपून करत नाही, दिवसाढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.

याचबरोबर हात दाखवण्याचा विषयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्याबरोबर आले. जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते कुणाचं काम करत होतं. कुणासाठी सरकार चालवलं जात होतं. ते सर्वसामान्यांना मान्य नव्हतं म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. हात आम्ही ३० जूनलाच ज्यांना दाखवायचा होता त्यांना दाखवलेला आहे, चांगला हात दाखवला आहे. अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या