Maharashtra assembly election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाहीच! निवडणूक आयुक्तांनी बाकी सगळं सांगितलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra assembly election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाहीच! निवडणूक आयुक्तांनी बाकी सगळं सांगितलं!

Maharashtra assembly election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाहीच! निवडणूक आयुक्तांनी बाकी सगळं सांगितलं!

Updated Sep 28, 2024 05:39 PM IST

election commission press conference : राज्यातील ११ राजकीय पक्षांशी आमची चर्चा झाली आहे. सणासुदीचे दिवस आहेत,हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करा,अशी सूचना सर्व पक्षांकडून करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

 मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद
मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

Maharashtra assembly election 2024 : राजकीय पक्षांसह महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीची नेमकी तारीख घोषित करणं निवडणूक आयोगानं तूर्त टाळलं आहे. मात्र, दिवाळीनंतरच निवडणुका होतील, असं स्पष्ट केलं आहे. 

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा व एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्य विधानसभेचा कार्यकाळ येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. आयुक्तांनी सर्व सरकारी यंत्रणा आणि राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेचा तपशील यावेळी सांगितला. 

लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होतील, अशी इच्छा व्यक्त करत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ‘आमचे महाराष्ट्र आमचे मतदान’ अशी यंदाची टॅगलाईन असेल.  त्यांनी सांगितले की, राज्यातील ११ राजकीय पक्षांशी आमची चर्चा झाली आहे. सणासुदीचे दिवस आहेत, हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करा, अशी सूचना सर्वपक्षीयांनी केली. तसेच सुट्टीच्या दिवसात मतदान घेऊ नका,  आठवड्याच्या मधल्या दिवशी निवडणूक घेण्याची तसेच एकाच टप्प्यात घेण्याची विनंती राजकीय पक्षांनी केली आहे. 

यावेळी महाराष्ट्राची मतदारसंख्या ९.५९ कोटी आहे. यातील महिला ४.६४ कोटी मतदारांची संख्या आहे तर पुरुष मतदारांची संख्या ४.९५ कोटी आहे. तर पहिल्यांदा मतदान करणारे १९.४८ लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात १०.१ लाख १ हजार ८६ बुथ आहेत. शहरांतील बहुतांशी बुथच्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील, असेही राजीव कुमार सांगितले.

मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास मनाई -

शहरी भागातील बुथवर मतदान जास्तीत जास्त होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त्यांनी दिले आहेत. मोबाईल आत घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान करायला जाणाऱ्या मतदारांच्या मोबाईलची सोय करावी, अशी मागणीही राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. शहरी भागात मतदान बुथ केंद्रांची संख्या ४२ हजार ५८५, तर ग्रामीण महाराष्ट्रात ५७  हजार ६०१ मतदान बुथ केंद्र असणार आहेत. 

एटीएम व्हॅनला मनाई -

निवडणूक काळात एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात सायंकाळी ६  ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल. 

तीन वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची विनंती काही राजकीय पक्षांनी केली आहे. अशा अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या जातील. सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील. 

मतदानसंदर्भात तक्रारीसाठी ॲप

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या अॅपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या मतदान केंद्रावर काही गैरप्रकार घडला किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो अपलोड करून तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर दीड तासात निवडणुक आयोगाची टीम तिथं दाखल होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर