chicken, mutton shops in Pune and Pimpri-Chinchwad closed on Monday : अयोध्येतील राम मंदिराचे सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटन करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि २२) पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात मांस विक्री बंद ठेवली जाणार आहे. अखिल भारतीय जमियातुल कुरेश कृती समितीने (AIJQAC) हा निर्णय घेतला आहे.
राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा हा देशभर साजरा केला जाणार आहे. या मुळे शुक्रवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा अखिल भारतीय जमियातुल कुरेश कृती समितीने केली. या सोबतच प्राण प्रतिष्ठापना समारंभानंतर उत्सवाचा भाग म्हणून लाडू आणि पेढे देखील समितितर्फे वाटले जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे एआयजेक्यूएसी प्रमुख सादिक कुरेशी यांनी एका निवेदनात सांगितले की, “२२ जानेवारी रोजी पुण्यातील कुरेशी समाज अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चिकन आणि मटणाचे दुकाने बंद ठेवतील. समाजासाठी हा आनंदाचा प्रसंग आहे, कारण प्रभू राम हे सर्व धर्मात पूज्य आहेत.”
पुण्यातील कुंजिरवाडी गावात सामूहिक निर्णयात रहिवाशांनी २२ जानेवारीला मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर स्थानिक चिकन, मटण आणि दारूची दुकाने या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा हा जसा जसा जवळ येत आहे तसे तसे धार्मिक वातावरण टायर होत आहे. विविध प्रांतातील आणि विविध धार्मिक पार्श्वभूमीतील व्यक्ती अयोध्येला मार्गस्थ झाले आहे.