मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  wagh nakh : ठरलं तर! शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; कुठे अन् कधी पाहायला मिळणार?

wagh nakh : ठरलं तर! शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; कुठे अन् कधी पाहायला मिळणार?

Jun 17, 2024 07:14 PM IST

Shivaji maharaj wagh nakha : महाराष्ट्रातील जनतेला महाराजांच्या शौर्याची,पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखं'याची देह,याची डोळा'पाहता येणार आहेत. दरम्यानही वाघनखं केवळ३वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून तीन वर्षांनी ती पुन्हा ब्रिटनला पाठवली जाणार आहेत.

शिवरायांची वाघनखं  इंग्लंडवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर
शिवरायांची वाघनखं  इंग्लंडवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर

Chhatrapati Shivaji maharaj wagh nakha : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील तमाम शिवप्रेमींना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती व मोठ्या आतुरतेने ज्याची वाट पाहात होते, सरकारकडून त्याची घोषणा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर ज्या वाघनखांच्या सहाय्याने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या ऐतिहासिक वाघनखांच्या दर्शनाची आतुरता संपणार आहे. ही वाघनखं पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. शिवरायांची ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.त्यामुळेमहाराष्ट्रातील जनतेला महाराजांच्या शौर्याची,पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखं'याची देह,याची डोळा'पाहता येणार आहेत.

दरम्यानही वाघनखं केवळ३वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून तीन वर्षांनी ती पुन्हा ब्रिटनला पाठवली जाणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवरायांची वाघनखं भारतात येतील. म्हणजेच १ जुलै ते ७ जुलैच्या दरम्यान ही वाघनखं भारतात दाखल होणार आहेत. जुलैपासून पुढील १० महिने म्हणजेच २०२५ च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनखं या संग्रहालयात दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवकाळातील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. याचे काम अंतिम टप्प्यात आहे.शिवरायांची ही नखं ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ही वाघनखं मायदेशी परत आणण्यासाठी २०२३ मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम २९ सप्टेंबरला लंडनला गेली होती. वाघनखं परत आणण्यासाठी तीन जणांची जी टीम लंडनला गेली होती त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश होता.

त्या दौऱ्यात शिवकाळातीलहा ऐतिहासिक वअमूल्य ठेवा मुंबईत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनसोबत सामंजस्य करार केला होता. वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १८२४ मध्ये ही वाघनखं ब्रिटनला नेण्यात आली होती. आता हाशिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसाचा ठेवा महाराष्ट्रात आणला जात आहे.

 

कोठे पाहता येणार ही वाघनखं?

अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेली ही वाघनखं राज्यातील ४ संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनखं पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर