मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivaji Maharaj Statue : ‘या‘ कारणामुळे विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार

Shivaji Maharaj Statue : ‘या‘ कारणामुळे विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2023 11:16 PM IST

Chhatrapati Shivaji maharaj Statue : विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे लवकरच हा पुतळा बदलला जाणार आहे.

विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बदलण्यात येणार आहे. या पुतळ्यावर काही आमदारांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर  विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहे.

विधीमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. तो लवकरच बदलला जाणार आहे. विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार,  आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

लवकरच विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्या रुपात दिसणार आहे. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यासाठी पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्याचे काम सर जे. जे. कला महाविद्यालयास देण्यात येणार आहे.

का बदलला जाणार पुतळा?

सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यांचा आक्षेप आहे की, महाराज बसलेले सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नाही, असा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व आमदारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. तसेच अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी अर्थमंत्र्यांकडून व सत्ताधाऱ्यांकडून महाराजांच्या पुतळ्यास प्रथम अभिवादन करून मग सभागृहाचे कामकाज सुरू केले जाते. 

IPL_Entry_Point