Jaydeep Apte : जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; पुतळा कशामुळे पडला? वकिलांचे कोर्टात धक्कादायक युक्तीवाद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jaydeep Apte : जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; पुतळा कशामुळे पडला? वकिलांचे कोर्टात धक्कादायक युक्तीवाद

Jaydeep Apte : जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; पुतळा कशामुळे पडला? वकिलांचे कोर्टात धक्कादायक युक्तीवाद

Sep 06, 2024 12:21 AM IST

jaydeep apte : मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला पाच दिवसांची म्हणजे १०सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जयदीप आपटेच्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आपटेच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Chhatrapati Shivaji maharaj statue collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा उद्घाटनानंतर केवळ ८ महिन्यात कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी पुतळा दुर्घटनेपासून फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला (jaydeep apte) बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयदीप आपटेला येत्या १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिल्पकार आपटेनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता.

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर ११ दिवसांनी फरार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला. यानंतर त्याला गुरुवारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं. मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला पाच दिवसांची म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटेच्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आपटेच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

यापूर्वीही असे सात पुतळे कोसळलेत, आपटेच्या वकिलांचा दावा -

जयदीप आपटेचे वकील सोवनी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, मालवणात त्यादिवशी मुसळधार पाऊस पडत होता. सगळीकडे प्रचंड वारे होते.हा पुतळा ब्रॉन्झ वितळवून उभा केला होता. अशाच घटना याआधी घडल्या आहेत. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षांचा पुतळा पडला आहे. उज्जैनमध्येही तेथे जोरदार वाऱ्यामुळे ७ पुतळे पडले होते. मध्य प्रदेश सरकारने त्यावेळी तत्काळ दखल घेतली. मात्र मालवणमध्ये दुपारी एक वाजता हा पुतळा पडतो आणि तुम्ही किती वाजता एफआयआर दाखल करता?  हे पाहावे लागेल.

हा पुतळा सिमेंटचा नव्हता. याप्रकणी जीवितहानीचे कलम लावलं आहे. ते चुकीचं आहे. पुतळा उभारताना कोणाला तरी इजा होईल,अशी कोणाचीही भावना नसते. तसेच या दुर्घटनेत कुणाला गंभीर इजा झाल्याची कुठेही तक्रार दाखल नाही. त्यामुळे या प्रकरणात कलम १०९ व १२५लागू होत नाही. नटबोल्ट गंजलेले असल्याचे तक्रारी म्हटले आहे. मात्र गंजलेले नटबोल्ट बाहेरून दिसून येत नाही. ८ महिन्यांमध्ये पुतळा बेंड झाला, अशी कोणतीही तक्रार नाही. पुतळा बंदिस्त होता मग नटबोल्ट गंजलेले कसे दिसले? ही क्रिएट केलेली स्टोरी असल्याचा दावा आपटेच्या वकिलांनी केला.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर