छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेकअप करताना एका गर्भवती महिलेने बॉल पिन गिळल्याची घटना घडली. बॉल पिन चुकून तोंडात गेल्यानंतर महिला खूपच भयभीत झाली होती. ही महिला ६ महिन्यांची गरोदर आहे. तिने ही घटना घरच्यांना सांगितल्यानंतर तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
महिला गर्भवती असल्याने डॉक्टरांनी एक्स-रे किंवा सीटीस्कॅन न करता अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले. मात्र बॉलपिन पोटात राहिल्याने संपूर्ण रात्रभर या महिलेला त्रास सहन करावा लागला.
या महिलेला कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे होते. त्यासाठी महिला मेकअप करत होती. मेकअप करताना आणि स्कार्फ बांधताना तोंडात ठेवलेली बॉलपिन चुकून महिलेच्या पोटात गेली. ही महिला ६ महिन्यांची गरोदर आहे. ही पिन थेट महिलेच्या जठरात जाऊन अडकली. यामुळे महिला खूपच घाबरली होती.
या घटनेने महिलेचे कुटूंबीयही घाबरले. ही महिला गरोदर असल्याने डॉक्टरांनी एक्स-रे किंवा सीटीस्कॅन न करता एंडोस्कोपीचा पर्याय सांगितला. महिलेने जेवण केल्याने एंडोस्कोपी तात्काळ करणे शक्य नव्हते. महिलेने कशीबशी रात्र काढाली. सकाळी एंडोस्कोपीच्या माध्यमातून पोटातील पिन काढण्यात डॉक्टरांना यश आले. पिन जठरात अडकल्याने महिलेच्या पोटात असलेल्या बाळाला आणि महिलेला धोका होता, मात्र धोका टळला आहे. महिला आणि पोटातील बाळ दोघेही सुखरूप आहेत.
धक्कादायक म्हणजे या वर्षातील अशी ही पाचवी घटना असल्याचे महिलेवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर चेतन राठी यांनी सांगितले. पाचही घटनात महिलांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अशा पद्धतीने मेकअप करताना स्कार्फ बांधताना महिलांनीही काळजी घ्यावी, असं डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या