अजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं ‘घड्याळ’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं ‘घड्याळ’

अजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं ‘घड्याळ’

Jul 29, 2024 08:09 PM IST

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत.

माजी आमदार नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.
माजी आमदार नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचा बाज बदललेला दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यात कुठला आमदार कुठल्या पक्षात जाणार? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुती व महाआघाडीकडून आमदारांची पळवापळवी सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कन्नडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पहायला मिळण्याचे संकेत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्नसुरू आहे. त्यातच आज अजित पवार गटाने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत.

कन्नड विधानसभा मतदारसंघात उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. ते ठाकरे गटामध्ये आहेत. त्याचबरोबरशिंदे गटात असलेले माजी आमदार नितीन पाटील शिंदे गटाकडून आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते.मात्र नितीन पाटील यांनीआजअजित पवार गटात प्रवेश केल्याने महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटालासुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येथे उदयसिंह राजपूत विरुद्ध नितीन पाटील अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

कन्नड विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये मनसेचे हर्षवर्धन जाधवही निवडणुकीत उतरले होते. तर उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी शिंदे गटाकडून नितिन पाटील हे संभावित उमेदवार समजले जात असतानाच त्यांनी पक्ष बदलला आहे. त्यामुळे विधानसभेला यंदा तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

 

अजित पवारांना पहिला दणका, आमदाराचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश -

राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते व आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शनिवारी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी यांची शुक्रवारी भेट झाली होती. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सामील झाला होता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचे तिकीटही मागितली होते. त्यानंतर शनिवार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर