Sambhajinagar Accident : पैठण रोडवर भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवलं, १० ते १५ वाहनचालक जखमी, महिला ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar Accident : पैठण रोडवर भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवलं, १० ते १५ वाहनचालक जखमी, महिला ठार

Sambhajinagar Accident : पैठण रोडवर भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवलं, १० ते १५ वाहनचालक जखमी, महिला ठार

Published Jan 19, 2024 10:06 PM IST

Chhatrapati Sambhajinagar Accident : सोलापूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकने पैठण रोडवर अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांना धडक दिली आहे. यात १० ते १५ वाहनाचालक जखमी झाले असून एक महिला ठार झाली आहे.

Sambhajinagar Accident
Sambhajinagar Accident

छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण रस्त्यावरील वाल्मी नाकाजवळ भीषण अपघात झाला आहे. सोलापूरहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्यात थांबलेल्या अनेक वाहनांना उडवले. यात जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक गंभीर जखमी झाले असून एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी वाहनांच्या काचांचा ढीग साचला होता. 

भरधाव ट्रकने चार ते पाच मोटार सायकलींसह अनेक चारचाकी वाहनांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये एक महिला जागीच ठार झाल्याची बोलले जात आहे. अपघानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर महामार्गावरून ट्रक पैठण रोडवर उतरत होता. त्यावेळी उतारावरून ट्रक खाली येत असताना ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली.

पैठण मार्गावरील वाल्मी नाक्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहने मंद गतीने पुढे जात होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोलापुर धुळे महामार्गावरुन आलेल्या सुसाट ट्रकने पुढे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना उडवलं. 

घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. एकमेकांमध्ये अडकलेली वाहने बाहेर काढण्यात बराच वेळ लागला. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर