आज सर्वत्र जन्माष्टमी व दहीहंडीचा उत्साह असताना संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैठणमधून एक दु:खद घटना समोर आली असून एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुधाच्या कढईत पडून होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोहम्मद जियान मोहम्मद इरफान असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरामधील नेहरु चौक परिसरातील सजंरपुरा येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार अब्बु शमी कट्यारे यांची मालेगाव येथील विवाहीत मुलगी माहेरी आली होती. २८ ऑगस्ट रोजी मोहम्मद इरफान हा घरात खेळताना उकळत्या दुधात पडला होता. यात तो गंभीररित्या भाजला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज सकाळी चिमुकल्याचा मृत्यू झाला. पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यापूर्वी बुलढाण्यातही अशीच एक घटना घडली होती. बुलडाण्यात ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला होता. मिठाईचा व्यवसाय असलेल्या तिच्या वडिलांनी कढईत दुध तापवत ठेवलं होतं. त्यावेळी मुलगी खेळताना मोठ्या कढईत पडली. तिच्यावर देखील उपचार करण्यात आला मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या