मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Waluj MIDC Fire : वाळुज एमआयडीसीत हँडग्लव्हज बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

Waluj MIDC Fire : वाळुज एमआयडीसीत हँडग्लव्हज बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, ६ कामगारांचा होरपळून मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 31, 2023 12:50 PM IST

Waluj MIDC Fire : वाळूंज औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली असून या आगीत झोपेतच ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Waluj MIDC Fire
Waluj MIDC Fire

Waluj MIDC Fire news update: संभाजी नगर येथील वाळूंज औद्योगिक वासाहितीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. येथील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीत भीषण आग लागली असून यात कंपनीतील ६ कामगारांचा साखर झोपेत असतांना होळपरूळ मृत्यू झाला. तर चार कामगारांनी बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. 

मृत्यूमुखी पडलेल्या कामगारामध्ये एक ज्येष्ठ कामगार व  एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे.  मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (वय ३२), इक्बाल शेख (वय १८), ककनजी (वय ५५), रियाजभाई (वय ३२), मरगुम शेख (वय ३३) अशी  मृतांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह जळीत नव्हते. काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ukrainian strike : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्यानंतर युक्रेनचा प्रतिहल्ला; बेलग्रेडवरील हल्ल्यात १४ रशियन नागरीक ठार

वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणारी सनशाईन एंटरप्राईज कंपनी आहे. या कंपनीला मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी कंपनीत काही कामगार झोपले होते. यातील ६ कामगारांचा जळून मृत्यू झाला. तर ४ कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला.

सनशाईन एंटरप्राईज सी २१६ हँडग्लोज तयार करते. या कंपनीत तब्बल २० ते २५ कामगार काम करतात. यातील काही कामगार हे कंपनीमध्ये राहतात. हे झोपेत असतांना अचानक लागली. यातील काही कामगारांना गरम लागत असल्याने त्यांना जाग आली. त्यांनी इतर काही कामगारांना उठवत तातडीने बाहेर पळ काढला. मात्र, ही आग झपाट्याने पासरल्याने व बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने त्यांना बाहेर येणे शक्य नव्हते. काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने कंपनीतून बाहेर पडले. पण सहा जणांनाचा झोपतेच होळपरूळ मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशामक दल पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे.

अग्निशमन अधिकारी मोहन मुंगसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अडीचच्या सुमारास या कंपनीला आग लागली. यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संपूर्ण कंपनीला आग लागली होती. स्थानिकांनी आत सहा जण असल्याची माहिती दिली. आमच्या अधिकाऱ्यांनी आत जाऊन शोध घेतला असता सहा मृतदेह मिळाले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पुण्यात देखील अशीच एक घटना घडली होती. पिंपरी-चिंचवड परिसरात शोभेच्या मेणबत्त्या बवणाऱ्या कंपनीत आग लागून तब्बल ८ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

WhatsApp channel