Sambhaji Nagar Suicide: संभाजीनगरात रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या-chhatrapati sambhaji nagar suicide case 17 year old girl ended her life by jumping in well after being harassed by boy ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar Suicide: संभाजीनगरात रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Sambhaji Nagar Suicide: संभाजीनगरात रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Aug 19, 2024 04:39 PM IST

Chhatrapati Sambhaji Nagar Suicide Case : छत्रपती सांभाजीनगर येथे एकतर्फी प्रेमातून एक तरुण सतत एका मुलीला त्रास देत असल्याने कंटाळलेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलंत जीवन संपवलं आहे.

Sambhaji Nagar Crime
Sambhaji Nagar Crime

Chhatrapati Sambhaji Nagar Suicide Case : छत्रपती संभाजी नगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका बीएचएमएस करणाऱ्या तरुणीने वसतिगृहात आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना आता एकतर्फी प्रेमातून एक तरुण एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडली आहे. आरोपी तरुण तरुणीला 'माझ्यावर प्रेम कर...' अशी जबरदस्ती करत होता.

पूजा शिवराज पवार असं मृत मुलीचं नाव आहे. तर कासिम यासीन पठाण असे आरोपी तरुणाचं नाव आहे. तर तो पीडित मुलीला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने जीव दिला आहे. या घटनेमुळे तरुणीचे कुटुंबीय संतप्त झाले असून आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी हरसुल पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कासिम यासीन पठाण हा ओहर या गावात एका गॅरेजमध्ये कामाला होता. हा तरुण हरसुल येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तू माझ्यावर प्रेम कर अशी सातत्याने हा तरुण तरुणीकडे मागणी करत होता. पठन हा रोज त्रास देत असल्याने पीडित मुलीने रविवारी दुपारी १ च्या सुमारास गावातील एका विहिरीत उडी मारून जीव दिला.

तरुणी अभ्यासात होती हुशार

मृत पूजा ही अभ्यासात हुशार होती. ती अकरावीमध्ये सायन्समध्ये शिकत होती. शहरात एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिने क्लास लावला होता. त्यामुळे ती शहरात राहत होती. रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. आरोपी कासिम हा पूजाला गेल्या ८ महिन्यांपासून त्रास देत होता. ही बाब तिने तिच्या घरच्यांना देखील सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी कासिमला चोप देखील दिला होता. मात्र, त्याचा त्रास सुरूच होता. अखेर याला कंटाळून पूजा ने विहिरीत उडी मारून जीव दिला.

विभाग