मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षासह दोघे ठार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षासह दोघे ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 09, 2024 10:09 AM IST

Samruddhi Mahamarg Accident near Sambhaji nagar : समृद्धी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. संभाजी नगर येथे या मार्गावर झालेल्या अपघातात भंडारा येथील रासपचे जिल्हाध्यक्ष आणि दोन कार्यकर्ते यांचा जागीच मृत्यू झाला.

मृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघे ठार
मृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघे ठार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर आपघातांची मालिका सुरूच आहे. संभाजी नगर येथील समृद्धीवर महामार्गावरील हर्सूल-सावंगी परिसरात ट्रकला पाठीमागून भरधाव कारने शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी आहे. अपघातात ठार झालेल्यांपैकी एक राजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष असून दुसऱ्या व्यक्ति हा कार्यकर्ता आहे. हे सर्व कारने पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांना भेटण्यासाठी मुंबई गेले होते. परत जात असतांना हा अपघात झाला.

india china standoff : भारत चीन सीमेवर चाललय काय? एलएसीवर पाठवले १० हजार सैनिक, लष्कराची मोर्चेबांधणी; चीनचा तीळपापड

या भीषण अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (वय ३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (वय २४) आणि आशिष सरवदे (वय ७३ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार भंडाऱ्यातील हे चौघे कारने (क्र. एमएच ४३, एएल ८०२१) मुंबईला गेले होते. शुक्रवारी (दि ८) रात्री परत भंडाऱ्याकडे परत जात असताना त्यांची कार समृद्धी महामार्गाने चॅनल क्र. ४३६ जवळ आली. यावेळी समोर लोडिंग ट्रक (क्र. सीजी १५, डीबी ७१५८) जात होता. ट्रक त्याच्या लेनमधून धावत होता. घाटासारखा रस्ता असल्याने ट्रकची गती मंद होती. त्या ट्रकवर पाठीमागून भरधाव कारने धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावरील एकामागोमाग एक अपघात सुरू आहेत. विकासाचा हा मार्ग अपघात मार्ग म्हणून आता ओळखला जाऊ लागला आहे. प्रशासनाने अनेक उपाय योजना करून देखील या मार्गावरचे अपघात कमी झालेले नाही, या मार्गावर काही दिवसांपूर्वी पहाटे झालेल्या अपघातात तिघे ठार झाले होते. आतापर्यंत या महामार्गावर जवळपास एक हजाराहूं अधिक अपघात झाले असून यात ३६८ जणांनी आपला जीव गमावला आहे.

IPL_Entry_Point