धक्कादायक.. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस पथकाला वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून गोळीबार
Chhatrapati sambhaji nagar : औरंगाबादच्या केंब्रिज चौकातील टाकली फाटा येथे पोलीस पथकाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून आरोपींच्या गाडीवर गोळीबार केला गेला.
छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात पोलीस पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. औरंगाबादच्या केंब्रिज चौकातील टाकली फाटा येथे ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांकडून आरोपींच्या गाडीवर गोळीबार केला गेला. औरंगाबाद ग्रामीणच्या गुन्हे शाखेने संशयित गाडीला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस पथकाच्या अंगावर थेट गाडी घालण्याचा प्रयत्न झाला.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाने एक संशयित वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी केंब्रिज भागातील टाकली फाटा येथे सापळा लावला होता. संशयित वाहन तेथे आले मात्र समोर पोलीस दिसताच वाहन चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या दिशेने भरधाव वाहन येत असल्याचे पाहून पोलीस बाजुला झाले मात्र तरीही वाहन चालक पोलिसांच्या थेट अंगावर गाडी घालत होता.
त्यानंतर पोलिसांकडून वाहन रोखण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी वाहनावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
विभाग