मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhatrapati Sambhaji Nagar : तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar : तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 11, 2024 10:54 PM IST

Four Childern Drowned in Lake : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना वाळूज परिसरातील रांजणगावात घडली.

Chhatrapati sambhaji nagar
Chhatrapati sambhaji nagar

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. ही ह्दयद्रावक घटना गुरुवारी सांयकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. चार मुले तलावात बुडाल्याचे समजल्यानंतर शोधमोहीम सुरू केली. रात्री साडे आठच्या सुमारास चौघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. 

ही घटना संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. बिस्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १४ वर्षे) व अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे)  असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत. 

यातील अफरोज शेख व जावेद शेख सख्खे भाऊ आहेत. हे दोघे आपल्या मित्रांसोबत रांजणगावच्या बनकरवाडीलगत असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजले तरी मुले घरी न आल्याने मुलांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. त्यांना तलावाच्या काठावर मुलांची कपडे दिसून आल्याने मुले तलावात बुडाल्याचा संशय आला. याची माहिती वाळूज अग्नीशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात देण्यात आली.


सुचना मिळताच अग्निशमन दल घटनास्थली दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले गेले. एकाच गावातील चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने रांजनगावावर शोककळा पसरली आहे. 

WhatsApp channel