Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकांच्या एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाला अल्पवयीन मुलीने टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अजय जयवंत सासवडे याला अटक केली आहे. आरोपी मुलीच्या शाळेतील शिक्षक आहे. दौलताबाद पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने तिचे दप्तर तपासल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. शिक्षक सासवडेच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहेत. मुलीने आपल्या डायरीत शिक्षकाचे नाव लिहिले असून त्याच्या छळाला कंटाळूनच आपण जीवन संपवत असल्याचे मुलीने आपल्या जायरीत लिहिले आहे. त्याचबरोबर मम्मी मी तुला मला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगू शकले नाही, असेही मुलीने डायरीत लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वर्षभरापासून त्रास देत होता. कधी-कधी तो तिच्या शरीराशी चाळे करायचा. मुलीने याबाबत कुटूंबीयांना कल्पना दिली होती. यामुळे मुलीच्या कुटूंबीयांनी तिला या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाळा प्रशासनाने कुटूंबीयांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला व मुलीला त्याच शाळेत कायम ठेवले.
शाळा प्रशासनाने व मुलीच्या कुटूंबीयांनी समजूत घातल्यानंतही शिक्षकाकडून मुलीला त्रास सुरुच होता. आईने मुलीचे दप्तर पाहिल्यानंतर त्यामध्ये एक घड्याळ आढळून आले. त्यामध्ये अजयचा फोटो होता. त्यामध्ये दोन पत्रेही आढळून आली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेऊन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी शिक्षकास अटक केली आहे.
शिरुर तालुक्यातही एका अल्पवयीन मुलीनं एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. १५ वर्षीय मुलीनं पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. त्यात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अरुण मेमाणे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तर महिंद्र बांडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. धक्कादायक पिकअप व्हॅन मुलीला चालवायला देऊन वडील तिच्या शेजारीच बसले होते. या अल्पवयीन मुलीनं पिकअप भरधाव वेगात चालवून बाईकला उडवलं. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित बातम्या